Aatmapamphlet : आत्मपॅम्फ्लेट … जरा वेगळा हटके सिनेमा. सर्वानी पाहावा असा. या वेगळ्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. तर लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी ह्यांचे आहे.
ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ ह्या नव्या दमाच्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
66 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा सध्या अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
Aatmapamphlet : अशी आहे ही कहाणी….
‘अरे वाट नको धोपट, सरधोपट वहिवाट नको, खोपटात खोपट,’ असं म्हणत कथानायक असलेल्या आशिषची गोष्ट सुरु होते.
वर्गातल्याच एका मुलीने काही कारणास्तव नायकाचा हात पकडल्यावर तो स्पर्श नायकाला म्हणजे आशिषला तिच्या प्रेमात पाडतो.
एकतर्फी प्रेमातले सगळे सीन ह्या सिनेमात आहेत. पण हे सगळं दाखवत असताना तो सामाजिक व्यंगांना स्पर्श करीत सिनेमा पुढे जातो.
aatmapamphlet trailer : आत्मपॅम्फ्लेट सिनेमाचा ट्रेलर
सिनेमाचं अनेकांकडून कौतुक
सिनेमाच्या रिव्ह्यू देताना अनेकांनी कौतुक केलं आहे. उत्तम कलाकार, उत्तम कलाकृती, उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन, उत्तम चित्रीकरण, उत्तम नेपथ्य, उत्तम निर्मिती असल्याने सिनेमा अनेकांच्या मनात रुजतोय.
सिनेमात 90चे दशक उभे केले आहे. बारीक सारीक गोष्टींचा अचूक मांडणीद्वारे एक वेगळा फील देण्याचा प्रयत्न ह्या सिनेमात झालाय.
सिनेमा पाहताना मधूनच शाळा, टाईमपास, किल्ला, बीपी (बालक-पालक), एलिझाबेथ एकादशी अश्या चित्रपटांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
परंतु परेश मोकाशींच्या आवाजात सिनेमा हळूहळू पुढे सरकत जातो आणि एक वेगळीच छाप सोडतो.
हा सिनेमा सध्यातरी थिएटरमध्ये चांगला सुरु आहे. जास्त प्रसिद्धी जरी झाली नसली सिनेमाची तरी अनेकांनी सोशल मीडियावर ह्या सिनेमाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यामुळे सिनेमाला प्रसिद्धी आपसूकच मिळाली आहे.