South actors worked in Hollywood : बॉलिवूडची दमदार अभिनेत्री आलिया भट्टचा हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ या वर्षी ऑगस्टमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
आलियापूर्वी प्रियांका चोप्रापासून ते ऐश्वर्या रायपर्यंत हॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
केवळ बॉलिवूड कलाकारच नाही तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनीही हॉलिवूडमध्ये काम केले आहे.
या यादीत समंथा रुथ प्रभू ते थलैवा रजनीकांत आणि धनुष यांचा समावेश आहे. हॉलिवूडमध्ये काम केलेल्या साऊथच्या त्या स्टार्सबद्दल जाणून घेऊयात..
South actors worked in Hollywood : कोणते आहेत ‘हे’ सुपरस्टार्स?
समंथा रुथ प्रभू
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथाने अलीकडेच हॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक फिलिप जॉनसोबत ‘अॅरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ हा चित्रपट साईन केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता ताटी या प्रोजेक्टची निर्मिती करणार आहेत.
रजनीकांत
थलैवा रजनीकांत ‘ब्लडस्टोन’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक इलैयाराजा होते.
हेही वाचा : Upcoming Tata SUV Cars 2023 : टाटाच्या नव्या SUV कार लाँच होणार..! कोणत्या आहेत ‘या’ SUV Cars?
South actors worked in Hollywood : धनुष
धनुषने ‘द ग्रे मॅन’ चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात धनुषसोबत रायन गोसलिंग आणि ख्रिस इव्हान्ससारखे कलाकार दिसले होते.
पूजा कुमार
पूजा कुमार ही तमिळ वंशाची अमेरिकन अभिनेत्री आहे. ती तमिळ आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करते. पूजा कुमार ‘ड्रॉइंग विथ चॉक’ सारख्या चित्रपटात दिसली आहे.
नेपोलियन
दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता नेपोलियनने 2019 मध्ये ‘डेव्हिल्स नाईट’ चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.