Mia Khalifa Fitness : पश्चिम आशियातील लेबनॉनची मिया खलिफा हे अडल्ट इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. जरी मियाने ही इंडस्ट्री सोडली असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बोल्ड कंटेंटची राणी असण्यासोबतच मिया खलिफा एक फिटनेस फ्रीक देखील आहे. अडल्ट स्टार तिच्या फिटनेसकडे पुरेपूर लक्ष देते आणि तिची फिट फिगर याचा पुरावा आहे. जिला दाखवण्यात ती कधीच मागे राहत नाही.
पण फार कमी लोकांना माहित असेल की आज तिच्या फिट फिगरचा ठसा उमटवणारी मिया एकेकाळी इतकी फिट नव्हती. मियाचे वजन पूर्वी खूप जास्त होते. पण तिने आपल्या ट्रान्फॉर्मेशनने सर्वांनाच चकित केले. मियाने 22 किलो वजन कमी केले आहे. एका मुलाखतीत मियाने सांगितले होते की, ती लहानपणापासूनच निरोगी आहे. ती बाहेरचे भरपूर पदार्थ खात असे, त्यामुळे तिचे वजन खूप वाढले होते. त्यानंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच तिेने फिटनेसवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. मियाला नाश्त्यात अंडी, टोस्ट आणि ब्लॅक कॉफी घेणे आवडते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. दुपारच्या जेवणासाठी ती भात, शिजवलेल्या भाज्या, ग्रील्ड चिकन घेते. याशिवाय ती भरपूर पाणी पिते ज्यामुळे तिला हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
पॉर्नहबवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मियाने पॉर्न इंड्रस्ट्री सोडली मात्र तिच्या भूतकाळामुळे तिला दुसरं काम मिळणं कठीण झालं होतं. याविषयी तिने मुलाखत माहिती दिली होती. मियाने पॉर्न बनवणाऱ्या कंपन्या तरुण मुलींना आपल्या जाळ्यात खेचतात, असा आरोप देखील केला होता. मियाने केवळ तीन महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं. 2014च्या मे महिन्यात मिया या इंडस्ट्रीत आली आणि 2015च्या सुरुवातीला तिने हे काम सोडलं देखील होतं. मात्र, ज्यावेळी ती या इंडस्ट्रीतून बाहेर पडली त्यावेळी ती पॉर्नहब नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध हिरोईन झाली होती.
मिया म्हणते की, लोकांना वाटतं मी पॉर्न इंडस्ट्रीत कोट्यवधी रुपये कमावते. मात्र, या कामातून केवळ 12 हजार डॉलर्स मिळवल्याचे तिने सांगितले. त्यानंतर फुटकी कवडी कमावलेली नाही. मियाने नेहमीच तिच्या भूतकाळाविषयी बोलणं टाळलं. मात्र, आता आपण आपल्या भूतकाळातल्या त्या प्रत्येक बाबीवर प्रकाश टाकायला तयार आहे असं ती सांगते. ती म्हणते जर तो बिझनेस माझ्या नावावर चालत असेल तर कुणीही त्याचा वापर माझ्या विरोधात करू शकत नाही.
इंस्टाग्रामवर मियाचे 17 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ट्रोलर्स तर तिला अनेकदा धमक्या देखील देतात. ती म्हणते, लहान-सहान धमक्यांची आता भीती वाटत नाही. लोकांच्या बोलण्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटत नाही. मियाने आपला पहिला पॉर्न व्हिडियो ऑक्टोबर 2014मध्ये बनवला होता. अवघ्या दोन-तीन महिन्यातच ती पॉर्नहब वेबसाईटची नंबर वन पॉर्नस्टार झाली होती.